थोडक्यात
चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ
गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप देण्यात येत आहे
(Chinchpoklicha Chintamani Visarjan) आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.
बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. हा दिवस लहान मुलांसोबत मोठ्यांसाठी देखील भावूक करणारा असतो. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या नाम घोषात बाप्पाला आज निरोप दिला जाईल. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.
यातच चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला असून मिरवणुकीसाठी गणेशभक्त चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. आज चिंचपोकळीच्या चिंतामणीला जड अंतकरणाने निरोप देण्यात येणार आहे. गुलालाच्या उधळणीत ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप देण्यात येत आहे.